का भांडले कळेना, मातीसवे बियाणे नसतील त्यास दिसले, पत्रावळीत दाणे हंगाम ह्या सुखांचा, गेल्यावरीच येते हे दुःख बारमाही, झाले अता शहाणे चौकात मागणारा, मुलगा मला म्हणाला : "शाळेत न्याल का हो ? की द्याल फक्त नाणे ?" गेली निघून मैना, तोडून पाश सारे वस्तीत माणसांच्या, नाही तिची ठिकाणे गेली हयात तेव्हा, आला निकाल हाती सोडून द्यायचे का, न्यायालयात जाणे ? डोळ्यांत बालकांच्या, स्वप्ने किती उद्याची बहरेल देश माझा, ताज्या फुलाप्रमाणे ● विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती.
Write a comment ...