सारखी चकवा मला देऊन जाते ही झळाळी नेमकी कोठून जाते ? सहजतेने केवढ्या तोडून बसतो जन्मभर मग सांधणे राहून जाते लागते जेव्हा कळाया जगरहाटी गोजिरी आख्यायिका संपून जाते दाबले इच्छेस एका फार पूर्वी आजही ती जोगवा मागून जाते एरवी रेंगाळलो असतो किनारी लाट काळाची मला ढकलून जाते - विश्वजीत गुडधे
Write a comment ...