हृदयात भावनांचा कर्फ्यू असेल तेव्हा नीरव अशा क्षणांनी ते गजबजेल तेव्हा नाते विणायचे तर आलेच गाठ पडणे टोकांस दोन दोघे, गुंता सुटेल तेव्हा संपेल हे वलय अन माझी नजर उपाशी सर्वत्र फक्त ग्लॅमर हुडकत फिरेल तेव्हा येईन बिलगण्याला लाटेपरी पुन्हा मी जेव्हा तुला किनारा होणे जमेल तेव्हा सारून बघ कधी तू हे पूर्वग्रह जरासे दृष्टीपल्याडचेही नक्की दिसेल तेव्हा ● विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती.
Write a comment ...